महिलेवर रिक्षा चालकाकडून अत्याचार

0
चाकण : भाम येथील टाटा कंपनीमध्ये काम शोधण्यासाठी निघालेल्या महिलेवर रिक्षा चालकाने संधी साधून अत्याचार केला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 12) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भाम येथे घडली. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगेश आगळे (वय 30) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला बुधवारी सकाळी मोशी येथून भाम येथील टाटा कंपनीमध्ये काम शोधण्यासाठी गेली. दुपारच्या वेळी जाताना तिने आळंदी फाटा ते भाम हा प्रवास खाजगी ओम्नी कारमधून केला. काम शोधून परत घरी येत असताना भाम बस स्टॉपवर तीच ओम्नी कार दिसली. त्यामुळे महिलेने ओम्नी चालकाला मोशीला जाणार का असे विचारले. त्यावर चालकाने होकार दर्शविला. महिला चालकाशेजारी पुढच्या सीटवर बसली. चालत्या प्रवासात महिला आणि ओम्नी चालक यांचे बोलणे झाले. दरम्यान त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांकही घेतले.
गाडीतील सर्व प्रवासी चाकण पूर्वीच उतरले. ओम्नी चालक मंगेश याने डाव साधत आळंदी फाट्याला ट्राफिक जॅम असल्याने आपण आळंदी मार्गे जाऊ असे महिलेला सांगितले. थोडी ओळख निर्माण झाल्याने महिलेने त्यासाठी होकार दर्शविला. आळंदी फाट्यापासून पुढे काही अंतर जाताच एका तळ्याच्या शेजारी मंगेशने गाडी आडमार्गे घेतली. महिलेला संशय आल्याने तिने याबाबत विचारणा केली. त्यावर चालकाने महिलेला चाकूचा धाक दाखविला. त्यामुळे महिला असहाय झाली. ओम्नी चालकाने महिलेवर बलात्कार केला आणि तिला तिथेच सोडून पळून गेला. यावरून महिलेने चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

भाम येथील टाटा कंपनीमध्ये काम शोधण्यासाठी निघालेल्या महिलेवर रिक्षा चालकाने संधी साधून अत्याचार केला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 12) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भाम येथे घडली. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगेश आगळे (वय 30) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला बुधवारी सकाळी मोशी येथून भाम येथील टाटा कंपनीमध्ये काम शोधण्यासाठी गेली. दुपारच्या वेळी जाताना तिने आळंदी फाटा ते भाम हा प्रवास खाजगी ओम्नी कारमधून केला. काम शोधून परत घरी येत असताना भाम बस स्टॉपवर तीच ओम्नी कार दिसली. त्यामुळे महिलेने ओम्नी चालकाला मोशीला जाणार का असे विचारले. त्यावर चालकाने होकार दर्शविला. महिला चालकाशेजारी पुढच्या सीटवर बसली. चालत्या प्रवासात महिला आणि ओम्नी चालक यांचे बोलणे झाले. दरम्यान त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांकह