जळगाव/चाळीगसाव। तालुक्यातील शिरसोली येथे मारूती खडी मशिनवर काम करणार्या ममताबाई बारेला या महिलेचा मृतदेह नाल्यात तरंगतांना आढळला. पोलिसांनी तिच्या पतीसह दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली की या खुनामागे आणखी काही कारण आहे?; हे शवविच्छदेनानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान चाळीसगाव शहरातील शिव कॉलनीत 3 जुलै रोजी रात्री राहत्या घरात 20 वर्षीय तरूणीचा अज्ञात मारेकर्याने तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केल्याची घटना घडली . शहर पोलीस स्टेशनला अज्ञात मारेकर्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळावर जळगावचे ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले परंतू त्यांना कुठलाच माग काढता आला नाही. सायलीची आई रत्ना पाटील यांच्या म्हणण्यानुसार खून झाला त्यावेळी त्या शेजारी गेल्या असल्याने परतल्या नंतर त्यांना त्यांची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. या तरुणीचा खून प्रेम प्रकरणातून झाला असावा अशी चर्चा होती. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला असून संशयित तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरु आहे. प्रशांत बच्छाव, डीवायएसपी अरविंद पाटील, पो.नि.रामेश्वर गाडे पाटील, सपोनि राजेंद्र रसेडे यांनी घटना स्थळाला भेट दिली.
देवगाव देहारीचे रहिवाशी
ममताच्या अंगावर कोणत्याही मारहाणीच्या खुणा नसल्याचे पोलिस अधिकार्यांनी सांगितले. शिरसोली येथे नेवार नाल्याशेजारी मारूती खडी मशिन येथे राजु मानसिंग बारेला हा पत्नी ममताबाई बारेलासह दोन मुलांबरोबर राहत होता.तेे मुळचे चोपडा तुलक्यातील देवगाव देहारी येथील रहिवाशी आहेत. काम करण्यासाठी शिरसोली येथील खडी मशिनवर दोन्ही पती-पत्नी बर्याच वर्षापासून काम करीत होतेे.
डोक्यात तीक्ष्ण हत्याराचे वार : जुना मालेगाव रोडवरील शिव कॉलनीतील रहिवाशी व के. आर. कोतकर महाविद्यालयात बीएस्सी तृतीय वर्षाचे शिक्षण घेणारी तरुणी कु सायली पाटील ही वडील अनिल पाटील व आई आणि भावासोबत राहत होती.अनिल पाटील चाळीसगाव एस. टी. डेपोत कंडक्टर आहेत. 2 दिवसांपासून ते पंढरपुरला बस घेऊन गेले होते. पत्नी, मुलगा व सायली घरी असतांना 3 जुलैरोजी रात्री 8:30 ते 11:30 वाजेच्या दरम्यान घरात अज्ञात मारेकर्याने सायलीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा निर्घृण खून केला.
फक्त डोळा सुजलेला : पुना भिल व भगवान भिल हे दारूचा व्यवसाय करीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्या रात्री या दाघांनी राजु बारेलाला दारू पाजुन त्याच्या पत्नीला सोबत घेऊन ते निघून गेले. पोलिस सुत्रांनी सांगितले की तिच्यावर बलात्कार करून हत्येनंतर तिला फेकून दिले असावे अशी शंका आहे. ममताबाई बारेलाचा मृतदेह पाण्यातून काढल्यानंतर तिचा डावा डोळा सुजलेला दिसत होता. त्यासाठी पोलिसांनी तिचा व्हिसेरा काढला असून त्यानंतरच पुढील तपासाचा मार्ग ठरेल. राजु बारेला ,पुना भिल, भगावान भिल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे असे सपोनि बागुल यांनी सांगितले. सर्वप्रथम राजाराम पाटील यांनी पोलिस पाटील श्रीकृष्ण वराडे यांना माहिती दिली. त्यांनी एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती दिली सपोनि बागुल यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर पाण्यातील मृतदेह सकाळी 10 वाजेला भिमा रामदेव बारी याने बाहेर काढला.
पतीचे मित्रांसोबत मद्यप्राशन
दि.3 रोजी रात्री पुना भिल व भगवान भिल हे दोघे जण राजु बारेला यांच्या घरी आले होते. त्यांनतर या तिनही जणांनी दारू रिचवल्याची माहिती समोर येत आहे. राजु बारेला खुप दारू पिल्याने त्याच्या राहत्या घरातच बेशुध्द पडला. त्यानंतर त्या दोन जणांना तिला नेवारे नाल्याजवळ नेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर काय झाले कोणीच सांगु शकलेले नाही