महिलेस मारहाण करून मोबाईल, पैसे हिसकावले

0

जळगाव । पाळधी येथे राहण्यास नकार दिल्याच्या कारणावरून महिलेस पती, सासू व चुलत सासूने मारहाण करून तिच्या जवळील मोबाईल व पंधराशे रुपये बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास हरिविठ्ठलनगर येथे घडली. याप्रकरणी मंगळवारी महिलेलेने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू व चुलत सासूविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी पती संतोष कुमावत यास अटक केली आहे.

अशी घडली घटना…
दिपाली यांचे चार वर्षापूर्वी सतोष कुमावत यांच्याशी लग्न झाले होते. परंतू, कौटूंबिक वाद वाढतच चालल्याने दिपाली यांनी घटस्फोटाचा निर्णय घेत न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यामुळे त्या हरिविठ्ठलनगरात माहेरी आईच्या घरी मुलगी शुभांगी व मुलगा हितेश अशांसह राहत होत्या. परंतू, सतोष याने समजूत घातल्यानंतर दिपाली यांनी खटला मागे घेतला. त्यानंतर रविवारी 28 जानेवारीला संतोष हा पत्नीस घेण्यासाठी हरिविठ्ठलनगरात आला. परंतू, पाळधी (ता.जामनेर) येथे येण्यास नकार देताच संतोषने गोळ्या खाऊन आत्महत्तेचा प्रयत्न केला. त्यांना लागलीच जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मंगळवारी डिसचार्ज मिळाल्यानंतर पती संतोष व दिपाली यांच्या सासु सखुबाई व चुलत सासु विमलबाई हे तिघे रात्री 9 वाजेच्या सुमारास हरिविठ्ठलनगरात येऊन पुन्हा पाळधी येथे चलण्याचा दिपाली यांच्याजवळ तगादा लावला. त्यांनी येण्यास नकार दिल्याने पती, सासु व चुलत सासूने वाद घालून दिपाली यांना मारहाण केली व त्यांच्याजवळील पाच हजार रूपये किंमतीचा मोबाईल व पंधराशे रुपयांची रक्कत बळजबरीने हिसकावून घेतले. तर त्यांचे शिवण दुकानाची तोडफोड देखील केली. घाबरलेल्या दिपाली ह्या त्यानंतर मैत्रीणीकडे निघून गेल्या. याप्रकरणी मंगळवारी दिपाली कुमावत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती संतोष यास पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पूढील तपास गोपाल चौधरी हे करीत आहेत.