मांगलेसोबत माझीही टेस्ट करा

0

धुळे । प्रकरणाच्या अंतापर्यंत पोहचण्यासाठी सर्व टेस्टला सामोरे जाण्यास तयार असून तक्रारी करा, मांगले,मोपलवार आणि माझी सुध्दा लाय डिटेक्टर, ब्रेनमॅपींग,नार्कोटेस्ट करा, असे आव्हान आ. अनिल गोटे यांनी आज राष्ट्रवादीला दिलेे. दोन दिवांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजवर्धन कदमबांडे व शहराध्यक्ष मोरे यांनी पत्रकारपरिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवून आ. गोटेंवर आरोप केले. याला प्रत्रुत्तरांसाठी पत्रकार परिषद घेत रा.काँ.वर पलटवार केला. मी मांगले कुटूंबाला मदत केली हे हजार वेळा सांगितले आहे. मात्र ज्यावेळेस त्याचे खरे स्वरुप समजले त्यावेळी सर्वांसमक्ष मी त्यांना हाकलून लावलं होतं.पती-पत्नी दोघांना. त्यांना हाकलून दिल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांसुध्दा यापुढे माझी पायरी न चढण्याबाबत खडसावलेचे स्पष्ट केले.

गौडाला धमकी दिली नाही
राष्ट्रवादीने प्रसिध्द केलेल्या ऑडिओ क्लीपबद्दल बोलतांना आ.गोटे म्हणाले की,मी गौडाला धमकी दिली असे कुठे म्हटल्याचे मला सांगा, गौडाला मी कोठेही धमकावले नाही. 26, 27, 28 तारखेला मांगले माझ्या सोबत होता हे मला मान्य आहे. जे आहे ते मी कधीच नाकारत नाही. सर्वांना पुरुन उरणारा एकटा, अशी राजकारणातील माझी प्रतिमा आहे. मी तुम्हाला पुन्हा-पुन्हा आणि शंभर वेळा जाहीर आव्हान देतो,तुम्ही माझ्याविरुध्द दर आठवड्याला एक-एक नवीन तक्रार घेवून मुख्यमंत्र्यांकडे जात जा. नवीन तक्रारी मिळाल्या नाही तर, जुन्या तक्रारी पुन्हा पुन्हा घेवून जा. असेही आ. गोटे म्हणाले.

पालिका जळीत कांडाची आठवण
गुड्या चोर प्रकरणात कदमबांडे,कैलास चौधरी, हिंमत जाधव आणि इतरांची सुध्दा टेस्ट होवूनच जावू द्या असे आ.गोटे म्हणाले. राष्ट्रवादीचा स्थायी समितीचा अध्यक्ष आणि गुड्ड्याचा काय संबंध? त्याच्या भावाला पोलिसांनी मोक्का लावला तो कशा करीता? त्याची पत्रकार परिषद का घेत नाही? असा सवालही आ.गोटेंनी राष्ट्रवादीला विचारला आहे. गुड्ड्याची हत्त्या होण्यापुर्वी रात्री म्हणजेच 17 जुलै रोजी नेहरु चौकात उभा राहुन गुड्ड्या हा कैलास चौधरीला शिव्या का देत होता? पालिका रेकार्ड जाळल्याप्रकरणात गुड्ड्या नाशिकरोड जेलमध्ये असतांना चौधरी बंधू गुड्ड्याची भेट का घेत होते? स्वयंपकाच्या गॅसचा काळा बाजार करण्यासाठी पारोळा रोडला लागून असलेल्या कुणाच्या गोडावूनवर पालीका जळीत कांडानंतर कुणी- कुणाला लपवून ठेवले होते? कुठल्या चौधरी बंधूशी त्याचे आर्थिक लागे बांधे होते. असे नानाविविध सवाल उपस्थित करून आमदार गोटेंनी राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे.

दूध का दूध पाणी का पानी
तुमचे मागचे पुढचे सर्व एकत्र या आणि दुध का दुध आणि पाणी का पाणी करुनच घ्या, मी सर्व कायदेशीर जबाबदारी घेवून लेखी देतो की, त्यामुळे मी जाहिरपणे सांगतो की, मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीसाठी मी ढाण्या वाघ आहे,पंजा मारायची आवश्यकता नाही,नुसत्या डरकाळीनेच तुमचा रंग बदलेल. सांगा कधी आणि कुठे घेतात टेस्ट,आता मागे हटु नका,न्यायालयात जाण्याची, टेस्ट करुन घेण्याच्या सर्व मागण्या मला मान्य आहेत. सांगा केव्हा? कुठे ? आणि कधी घेता टेस्ट? असा सवाल आ. गोटेंनी केला.