मांजरोद येथील मोटारसायकलस्वार कारच्या धडकेत ठार

0

शिरपूर । तालुक्यातील मांजरोद येथील रहिवासी भगवान सोमा धनगर (39) हे मोटारसायकल (एमएच 18/ एव्ही-8028 )ने जात असतांना मांजरोद गावानजीक धरमखेडी नाल्यापासून एक किलोमीटर अंतरावर फोर्ड फिगो कार (एमएच 15/सीएम- 9324) ने समोरून मोटारसायकलला धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने भगवान धनगर यांचा मृत्य झाला. अपघातानंतर कारचालक न थांबता पसार झाला. याप्रकरणी मधुकर सोमा धनगर यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन कार चालकाविरूध्द भादंवि कलम 304 (अ), 279, 337, 427, मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्युत वाहिनीचा खांब वाकवून नुकसान
धुळे शहरातील चाळीसगाव चौफुलीवरील बॉम्बे ऑटो गॅरेजसमोरील वीज वितरण कंपनीच्या लघुवीज वाहिनीचा पोल क्र.डीटीसी 4215435 हा आसीसी खांब अज्ञात व्यक्तीने वाकवून नुकसान केले. याप्रकरणी निरजकुमार आदित्यनाथ रा.राणीमेडिकलजवळ, धुळे यांनी चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द भादंवि कलम 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही.सी.मोरे करीत आहेत.

गायीसह वासरू लंपास
साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील मल्याचा पाडा गाव शिवारातील मंगलबाई साहेबराव पवार (45) रा.माळी गल्ली, पिंपळनेर यांच्या मालकीच्या शेतातून 32 हजार रुपये किमतीचे एक गाय व एक वासरू अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना दि.20 एप्रिलच्या रात्री घडली. याप्रकरणी मंगलबाई पवार यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरूध्द भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकॉ परदेशी करीत आहेत.