शिरपूर – शिरपूर तालुक्यातील मांजरोद ग्रामपंचायत मधील 27 लाख रुपयांचा झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ डी.गंगाथर यांच्या आदेशाने अखेर आरोपीं विरुद्ध थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की , मांजरोद ग्रामपंचायत मार्फत झालेल्या विकास कामात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याने ग्रा.पं. सदस्य नामदेव कोळी ,सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र राजपूत,डॉ.सरोज पाटील,नवनाथ राजपूत,लोटन राजपूत आदींनी दोषींवर कार्यवाही होण्याबाबत आमरण उपोषणाचा पवित्रा घेतल्याने दोन वेळेस उपोषण कर्त्यांनी उपोषण केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यानी त्याची दखल घेत मांजरोद गावात झालेल्या विकास कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करत दोषींवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरन यांनी दिल्याने आर.झेड.मोरे विस्तार अधिकारी ग्रा.पं. शिरपूर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आज रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सन 2010-11 ते 2014-15 या कालावधीत मांजरोद गरमपंचयात मार्फत झालेल्या विकास कामात सरपंच श्रीमती सुनीता भुलेश्वर पाटील,के.एल.महाले ग्रामविस्तार अधिकारी मांजरोद,एच.एस.चौधरी ग्रामसेवक यांनी संगनमताने शासकीय रकमेचा स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी ग्रामपंचायत मांजरोद येथील विविध शासकीय योजनेतील 27 लाख 62 हजार 73 रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी आज थाळनेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा सहाय्यता कलम 2011 मधील नियम 24 नुसार भाग 5 गु.र.न.31/2018 भा .द.वि.कलम 406,409,467,468,471,120 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे