भातखंडे । येथून जवळच असलेल्या मांडकी येथे सुभाष धनराज चौधरी या भाविकाने स्वखर्चाने नवीन मंदिराचे बांधकाम केले. यामागचा उद्देश असा की जे भाविक बाळुमामाच्या दर्शनासाठी आदमापुर या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यांना रोज दर्शन घेता यावे, म्हणून या उड्डात भाविकाने मंदिराची स्थापना स्वखर्चाने केली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. यात 51 जोडप्यांच्या हस्ते होम हवन करण्यात आले. तसेच 13 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता गावातून मूर्तीची व पालखीची शोभायात्रा काढण्यात आली. नंतर कारभारी बापू गायकवाड यांच्याहस्ते मूर्तीची स्थापना करण्यात आली.
संत सद्गुरू बाळुमामा बाबत यांचा जन्म कर्नाटक राज्यातील अकुलगाव मध्ये झाला. 1966मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे त्यांनी समाधी घेतली. कोल्हापूर येथे बाळूमामाचे मंदिर संस्थान आहे. पुणे जवळ श्री सद्गुरू बाळूमामा देवालय आहे. त्याचा जन्म एका धनगर कुटुंबात झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापुर या गावी बाळू मामांनी संजीवन समाधी घेतली. मामा संपूर्ण राज्यामध्ये भ्रमण करत प्रत्येक गावात त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जात असत. बाळूमामाचे आदमापूर याठिकाणी मोठी संस्था आहे. या संस्थानांत भरपूर मंडप आहे. धर्मशाला आहे. जनतेच्या कल्याणासाठी संपूर्ण राज्यात भ्रमण करत. भाविकांना मामा सांगायचे जगाच्या कल्याणासाठी ही पालखी निघाली आहेत. असे ते सांगत मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठेच्या कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.