मुंबई : सैयामी खेरने दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरांचा चित्रपट ‘मिर्ज़ियाँ’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर ती आता मराठी चित्रपट “माऊली”मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणास तयार आहे.
‘माऊली’चे प्रमोशन पूर्ण महाराष्ट्र भर सुरु आहे. प्रमोशनच्या दरम्यान चित्रपटातील सर्व मुख्य कलाकार रितेश देशमुख, जितेंद्र जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांनी जेजुरी आणि पढंरपुरची वारी केली , अभिनेत्री सैयामीला पहिल्यांदाच जेजुरी आणि पंढरपुरला जाण्याचा योग आला. जेजुरीमध्ये खंडोबा आणि पंढरपुर मध्ये विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने सैयामी खुप आनंदात आहे आणि चित्रपट प्रदर्शना साठी खुप उत्साही आहे. हा चित्रपट १४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.