माऊली फाउंडेशनने विद्यार्थ्यांना दिली 500 रोपे

0

रावेर। येथील माऊली फाउंडेशनद्वारा संचलीत आदित्य इंग्लिश स्कुल व संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदीर मधील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करुन संवर्धन करावे यासाठी सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणपुरक वृक्षांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करुन मागील वर्षी शाळेत लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. तसेच यावर्षीसुध्दा नव्याने वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, तहसिलदार विजयकुमार ढगे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, नगरपालिका आरोग्य सभापती अ‍ॅड. सुरज चौधरी, डॉ. सुरेश महाजन, कृष्णा पाटील, डॉ.संदीप पाटील, डॉ. योगिता पाटील, माऊली फाउंडेशनचे डॉ.एस.आर. पाटील, सुमन पाटील, पोलिस उपनिरिक्षक दिपक ढोमणे, ललीत चौधरी, रविंद्र चौधरी, वनपाल विकास सोनवणे यांसह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ.संदीप पाटील यांनी शाळेचा संपुर्ण परिसर जमा करुन ग्रीन स्कूल म्हणुन ओळख निर्माण करण्याचे बोलून दाखविले. ग्रीनआर्मी बाबत दिपक नगरे यांनी माहिती दिली, तर वनमहोत्सवासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी सविस्तर माहिती देतांना रावेर तालुक्यात वृक्ष लागवड मोहिम राबवितांना सेवाभावी संस्थांचा मिळालेल्या सहभागात माउली फाउंडेशनचा अव्वल क्रमांक असल्याचेही सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदीराच्या प्राचार्या सविता चौधरी यांनी केले. तर आभार दिक्षा पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी आदित्य स्कूलचे प्राचार्य संजय पाटील यांसह दोन्ही शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.