मागणी वाढल्याने दागिन्याचे दर वाढले

0

नवी दिल्ली : खरेदीची मागणी वाढल्याने सोन आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. सोन्याचे दर ६० रुपयांनी वाढून ३१, ३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. तर चांदीचे दर ३५ रुपयांनी वाढून ३९,९५० रुपये प्रति किलो झाली. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोनं-चांदी खरेदी केल्यामुळेही दरांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं ०.१५ टक्के वाढून १,२४२.८० डॉलर प्रती ऑन्स आणि चांदी ०.१६ टक्के वाढून १५.८१ प्रति ऑन्स झाली.

दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये ९९.९ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३१,१५० रुपये आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३१,००० रुपये प्रती तोळा आहेत.