मागण्यांच्या पूर्ततेनंतर मसाका कामगारांच्या आंदोलनाची सांगता

0

फैजपूर– प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याने मधुकर साखर कारखान्याच्या कामगारांच्या आंदोलनाची 57 व्या दिवशी सांगता झाली. कामगार संघटनेचे 1 जानेवारीपासून आंदोलन छेडले होते. मधुकर साखर कारखान्याच्या राष्ट्रीय कामगार संघटनेने 16 डिसेंबरला पगार व प्रलंबित देणी मिळाव्यात यासंबंधी पत्र दिले होते. तोडगा न निघाल्याने आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनादरम्यान कारखाना पदाधिकार्‍यांनी दोन-तीन वेळा संघटना पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. पहिल्या टप्प्यात कामगारांचे तीन पगार अदा करण्यात आले मात्र आणखी दोन पगार व बेकार भत्त्याची मागणी पूर्ण करावी म्हणून 14 फेब्रुवारीला कारखाना कार्यकारी मंडळाची सभा झाली आणि सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर सोमवारी पुन्हा आंदोलनस्थळी सकारात्मक चर्चा होऊन चार हंगामी पगार, हंगामी कर्मचार्‍यांचे रिटेन्शन, ट्रेनी व रोजंदारी पगार, कपाती अदा केल्या असून कामगार संघटनेने आंदोलन मागे घेतले आहे.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी अध्यक्ष गिरीश कोळंबे, जनरल सेक्रेटरी एकनाथ लोखंडे, कामगार संघटना अध्यक्ष गिरीश कोळंबे, जनरल सेक्रेटरी एकनाथ लोखंडे, कामगार संघटना पदाधिकारी सदस्य, चेअरमन शरद महाजन, व्हाईस चेअरमन भागवत पाटील, संचालक नरेंद्र नारखेडे, माजी आमदार अरुण पाटील, आस्थापना व कामगार कल्याण उपसमिती चेअरमन संजीव महाजन, लीलाधर चौधरी, नितीन चौधरी, सुरेश पाटील, युवराज सरोदे यांच्यासह कार्यकारी संचालक महेश सगरे, सचिव तेजेंद्र तळेले उपस्थित होते.