भामरे । जुलै महिन्यांपासून बायोमॅट्रीक (पीओएस) पद्धतीने स्वस्त धान्य वितरीत केले जाणार आहे. शासनाने या वितरणाची तयारीस सुरूवात केली आहे. जिल्ह्याला एसएसओ, पीएसओ मशिन प्राप्त झाले आहेत. परंतु, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने मशिन घेण्यास विरोध केला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मशिन घेणार नाही असा पवित्रा संघटनेने घेतला आहे.
यासंदर्भांतील निवेदन जिल्हा पुरवठा अधिकार्यांना दिले आहे. याप्रसंगी गुलाबराव नांद्रे, प्रविण खैरनार, भाईदास पाटील, राजु टेलर, मधुकर पाटील उपस्थित होते. यावेळी चर्चेत पुरवठा अधिकार्यांना सांगण्यात आले की, नांदेड जिल्ह्यात वितरीत करण्यात आलेले पीओएस मशिन दुकानदारांनी पुरवठा विभागाकडे परत केले आहे. अशा प्रसंग जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी आम्ही मशिन ताब्यात घेणार नाही असे स्पष्ट केले. तसेच मानधन व इतर मागण्या मान्य न झाल्यावर मशिन घेण्यात येईल असे सांगितले.