मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा

0

नवी दिल्ली । राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या जागी आता नवीन आयोग स्थापन केला जाणार असून या आयोगाला घटनात्मक दर्जा देणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली.

या आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सरकार घटनेत दुरुस्ती करणार आहे. आत्तापर्यंत या संदर्भातील निर्णय संबंधित राज्याचे सरकार घेऊ शकत होते. मात्र, या घटना दुरुस्तीनंतर या संदर्भातील निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात येतील. जाट आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात येणार्‍या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. या नव्या आयोगासाठी सरकारकडून एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती या आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी सहा महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे.