सोलापूर-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहे. यावेळी बोलतांना त्यांनी मागील सरकारच्या कामगिरीवर निशाना साधला. मागील सरकारने २००४-२०१४ या दहा वर्षात कागदावर १३ लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी फक्त ८ लाख घरे संपूर्ण देशात बांधली. मात्र या सरकारने साडेचार वर्षात ७० लाख घरांना मंजुरी दिली, त्यापैकी १४ लाख घरे बांधली. मागील सरकारने जे १० वर्षात केले नाही ते या सरकारने साडेचार वर्षात पूर्ण केली असे सांगत मोदींनी मागील सरकारपेक्षा हे सरकार किती गतिमान आहे हे सांगितले.
मागील सरकारने एका वर्षात फक्त ८० हजार घरे बांधली. या सरकारने एका सोलापुरात ३० हजार घरे बांधली. गरीबांचा कळवळा असलेल्या कॉंग्रेस सरकारची कामगिरी या आकडेवारीवरून दिसते असा टोलाही मोदींनी लगावला.