माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

0

भुसावळात रक्तदान शिबिर, वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम

भुसावळ- भुसावळचे माजी आमदार संतोष छबीलदास चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी चाहते, कार्यकर्ते व हितचिंतकांतर्फे फळवाटप, रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण आदी कार्यक्रम राबवण्यात आले.  माजी आमदार चौधरी हे शहरात नसल्याने चाहत्यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन करून शुभेच्छा देत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले.
वृक्षारोपणसह रक्तदान शिबिर
जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ दिवसभरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. सुमारे 30 दात्यांनी रक्तदान केले. शिबिराचा शुभारंभ अनिल चौधरी यांचे चिरंजीव धीरज चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रसंगी गटनेता उल्हास पगारे, दुर्गेश ठाकूर, नितीन धांडे, सचिन पाटील, रवी सपकाळे, सिकंदर खान, आशिकखान शेर खान, सामाजिक कार्यकर्ते सारंग (छोटू) पाटील, ईम्रान पहेलवान, निनाजी नरवाडे, संगीत खरे, नरसीम तायडे, सोनू नेतकर, आनंद चौथमल, शरद दाभाडे, विजय मोरे, किरण तायडे, नितीन भालेराव, विजय सुरवाडे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दिवसभरत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगणावर तसेच शहरातील अन्य भागात सुमारे 60 झाडे लावण्यात आली. नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांच्यातर्फे नाहाटा चौफुलीवर वृक्ष वाटप करण्यात आले तर श्रद्धा नगरात रीक्षा स्टॉप फलकाचे अनावरण करण्यात आले.
चौधरी विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप
शहरातील सुशिलाबाई छबीलदास चौधरी प्राथमिक विद्यामंदिरात माजी आमदार चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह मिठाईचे वाटप करण्यात आले. प्रभारी मुख्याध्यापक डी.पी.बाविस्कर, उपशिक्षक सादिक पिंजारी, पद्माकर सोनवणे, सचिन नेमाडे आदींची उपस्थिती होती.