माजी उपमहापौर दीपक मानकर रुग्णायात दाखल

0

पुणे – शहरातील जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी अटकेत असलेल्‍या पुण्‍याचा माजी उपमहापौर दिपक मानकर याला तब्‍येत बिघडल्‍याने रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. गुरूवारी रात्री छातीत दुखत असल्‍याची तक्रार दीपक मानकरने केली होती. मानकरसह 9 जणांवर पुणे पोलिसांनी मोक्‍का (महाराष्‍ट्र संगठीत गुन्‍हेगारी प्रतिबंध कायदा) अतंर्गत कारवाई केली आहे.

जिल्‍हा न्‍यायालय व हायकोर्टाने मानकरचा अटकपूर्व जामीन फेटाळल्‍यानंतर बुधवारी मानकर पोलिसांना शरण आला होता. कोर्टाने त्‍याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.