यावल- माजी खासदार गुणवंतराव सरोदे यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यावल तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवार, 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू-भगिनींनी उपस्थित द्यावी, असे आवाहन आमदार हरीभाऊ जावळे, तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे, सरचिटणीस उज्जैन राजपुत, विलास चौधरी यांनी केले आहे.