जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश ; बर्हाणपूरात मुक्काम
भुसावळ- माजी नगरसेवक संतोष मोहन बारसे यांच्यासह किशोर हिरामण उर्फ गोजोर्या सकरू जाधव यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने त्यांना हद्दपार करण्यासंदर्भात बाजारपेठ पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी बारसे व गोजोर्या यांना सोमवारी एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत आदेश काढले आहेत. मंगळवारी बाजारपेठ पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी करीत बारसेसह गोजोर्या यांना बर्हाणपूरात सोडले. बारसे यांच्याविरुद्ध खून, गोळीबार, हाणामारी शस्त्र बाळगणे तसेच दहशत निर्माण करणे आदी प्रकरणी शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत तसेच गोजोर्या यांच्याविरुद्धही विविध गुन्हे दाखल आहेत. दोघांना हद्दपार केल्याबाबत तसेच त्यांना मंगळवारी बारसे यांना बर्हाणपूर येथे सोडण्यात आल्याच्या वृत्ताला बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी दुजोरा दिला.