माजी नगराध्यक्ष मधुकर चौधरी यांना आदरांजली अर्पण करून पालिकेची सभा तहकूब

0

चाळीसगाव-पालिकेच्या नगरपरिषदेची आज सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेला नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरुवात झाली. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

सभागृहात पालिकेचे विरोधी पक्ष नेते माजी आमदार राजीव देशमुख, सत्ताधारी पक्षाचे गटनेते राजेंद्र चौधरी, शहर विकास आघाडीचे उपनेते सुरेश स्वार, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नितीन पाटील, आण्णासाहेब कोळी, रामचंद्र जाधव, शेखर देशमुख, बापू आहिरे, आनंद खरात , सुरेश चौधरी, रवींद्र चौधरी , चिराग शेख, चंद्रकांत तायडे, संजय पाटील ,दिपक पाटील, विजया प्रकाश पवार, वत्सलाबाई महाले, रंजनाबाई सोनवणे, योगिनी ब्रम्हणकार, सविता राजपुत, मनीषा देशमुख, वंदना चौधरी, वैशाली मोरे, वैशालीताई राजपुत, विजया भिकन पवार, सायली जाधव, मानसिंग राजपुत, गीताबाई राजपुत, झेलाबाई पाटील, संगीता गवळी यांच्या सह पालिकेच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला दिवंगत माजी नगराध्यक्ष महुकर आण्णा चौधरी यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांनी तीस वर्षे पालिकेचे नगरसेवक तथा नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे आजची सभा तहकूब करण्यात यावी अशी सूचना सदस्य सुरेश चौधरी व रामचंद्र जाधव यांनी मांडली यावर शहर विकास आघाडीचे नेते माजी आमदार राजीव देशमुख यांनी मधु आण्णा चौधरी यांची पालिकेचे माध्यमातून जनतेच्या सेवेची कारकीर्द गौरवपूर्ण असल्याची भावना व्यक्त केली त्याला सत्ताधारी पक्षाचे नेते राजेंद्र चौधरी यांनी सहमती दर्शविली आणि आजची सभा तहकूब करण्यात आली. यावेळी सभा लिपिक दिपक देशमुख यांनी दिंवगत मधु आण्णा चौधरी व पालिका कर्मचारी मयुर वाघ यांच्या वरील शोक प्रस्ताव मांडला सभेच्या सुरुवातीला सदस्यानी दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहिली . आजची तहकूब झालेली सभा सोमवार दि. २४ रोजी होणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले आहे.