माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना पालिकेतर्फे अभिवादन

0

धिकारी व कर्मचार्‍यांनी घेतली सामुहिक शपथ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे आदी उपस्थित होते. दरम्यान, दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त, पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात अधिकारी व कर्मचार्‍यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी सामुहिक प्रतिज्ञा घेतली.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाच्यावतीने शाहूनगर येथे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे आणि माजी नगरसेविका निगार बारस्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष दिलीपसिंग मोहिते, महासचिव अमर नाणेकर, महासचिव अशोक मंगल, सचिव अशोक काळभोर, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष उमेश बनसोडे, चिंचवड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष संदेश नवले, आबा खराडे, हवेली सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.

ब्लॉक काँग्रेस कमिटी
सांगवी – चिंचवड ब्लॉक कमिटी व स्व.राजीव गांधी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची 27 वी पुण्यतिथी पिंपळे गुरव येथे साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश नवले याच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आली. पिंपळे गुरव येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. विनोद जाधव, विश्‍वास कानतोडे यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राहुल कदम, रुपेश गायकवाड, श्रेया जगताप यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. राजीव गांधी यांनी भारतात तंत्रज्ञानाची क्रांती घडवून आणली. आजच्या युवकांना त्यांच्यामुळे मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे युवकांची प्रगती होत आहे असे गौरोद्गार ज्येष्ठ नेते एन.के.स्वामी यांनी काढले. यावेळी दहशतवादाविरुद्ध लढण्याची शपथ आबा खराडे यांनी दिली. नितीन चांदणे, अर्जुन कांबळे यांनी परिश्रम घेतले.

अ प्रभाग कार्यालय
निगडी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिधी व दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी कर्मचार्‍यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी सामूहिक र ‘सद्भावना’ प्रतिज्ञा घेतली. निगडी प्राधिकरणातील अ प्रभाग कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सहायक आयुक्त व प्रभाग अधिकारी मंगेश चितळे, आरोग्य अधिकारी एम. एम, शिंदे, लटपटे यांच्यासह सर्व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी हजर होते. अनुराधा गोरखे यांनी सामूहिक जबाबदारी म्हणून काम करत असताना सर्वांनी माणुसकी जपायला हवी. धर्म, जातीसारखे भेदभाव दूर करायला हवेत. आपल्यामुळे देशाचे, राज्याचे किंवा आपल्या शहराचे कसलेही नुकसान होणार नाही. याची खबरदारी सर्वांनी घेतल्यास दहशतवाद, हिंसाचार समाजातून नाहिसा होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.