माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
दैनिक जनशक्तीचे मालक यतीनदादा ढाके यांनी भेट घेत वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा
भुसावळ : राज्याचे माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा गुरूवार, 2 सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्याने त्यांच्यावर आज दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव झाला. दैनिक जनशक्तीचे मालक व संपादक यतीनदादा ढाके यांनी गुरुवारी सकाळी मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवर जावून खडसे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी दैनिक जनशक्तीचे मुख्य व्यवस्थापक धन्यकुमार जैन उपस्थित होते.
जनशक्ती विशेषांचे केले कौतुक
अत्यंत धावपळीच्या वेळेतही नाथाभाऊंनी जनशक्तीच्या विशेषांकाचे प्रसंगी अवलोकन करीत तोंड भरून कौतुक केले. जनशक्तीचे मालक यतीन ढाके यांच्याशी त्यांनी काही मिनिटे विविध विषयांवर चर्चादेखील केली.
दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव
माजी मंत्री खडसे यांच्यावर दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मुक्ताईनगर येथील फार्मवर दिवसभर हजारो कार्यकर्त्यांची यावेळी गर्दी झाली होती. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मिडीया व फोनद्वारे शुभेच्छा देत नाथाभाऊंवरील प्रेम व्यक्त केले.