माजी मंत्री ए. टी. पवार यांचं निधन

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री अर्जुन तुकाराम अर्थात ए.टी. पवार यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ए. टी. पवार यांची प्रकृती खालावली होती. आठ दिवसांपासून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारांदरम्यानच त्यांचे निधन झाले.

कळवण मतदारसंघातून 8 वेळा विधानसभेवर निवडून गेलेले ए.टी.पवार यांनी आदिवासी भागात अनेक लोकोपयोगी कामे केली होती. आदिवासी विकास खात्याचं मंत्रिपद सांभाळताना त्यांनी अनेक योजनाही मार्गी लावल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जात. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय वर्तुळात दुःख व्यक्त केले जात आहे.