माजी मंत्री खडसेंची पिडीत कुटुंबांची भेट

0

जळगाव । शहरातील समतानगरातील नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन गोणपाटात टाकून उघड्यावर फेकल्याची खळबळजनक घटनेच्या पाश्‍वभूमीवर सोमवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पीडित कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली. यावेळी या अत्याचार प्रकरणातील गुन्हा जलद न्यायालयात चालवून संशयीत आरोपींना लवकर कठोर शिक्षा देण्यात येईल असे आश्‍वासन आमदार खडसे यांनी केले. दरम्यान पीडितेच्या वडीलास तुरुंगातून सोडवण्यास प्रयत्न करु असे देखील आश्‍वासन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सरीता माळी, अरुण चांगरे, अनिल अडकमोल, अशोक लाडवंजारी आदि उपस्थीत होते.

बालहक्क आयोग वाकडीमध्ये मात्र समतानगरात नाही – खडसे
शहरातील समता नगरातील मेहतर कुटुंबाच्या नऊ वर्षाच्या बालीकेवर अत्याचार व खून करून गोणपाटात गुंडाळून फेकल्याची घटना दिल्लीतील निर्भया घटनेपेक्षा पण मोठी असून हि घटना म्हणजे विकृत मनोविकृतीचे प्रदर्शन करणारी आहे. घडलेल्या घटनेची गुन्हा जलद न्यायालयात चालवून लवकरात लवकर आरोपींना शिक्षा देण्यात यावी तसेच महिला व बालहक्क आयोगाचे सदस्य वाकडी येथे गेले पण समता नगरातील घडलेल्या गंभीर घटनेच्या ठिकाणी का आले नाहीत, हि घटनापण तितकीच गंभीर असल्याने खडसे यांनी नाराजी वक्त केली. दरम्यान, या घटनेतील पिडीत कुटुंबातील बालिकेचे वडील अमरावती कारागृहात शिक्षा भोगत असून 14 वर्षे पुर्ण शिक्षा भोगली असून शिक्षेचा कालावधी जवळ जवळ पुर्ण झाला आहे. यामूळे घरातील कर्ता पुरुष असल्याने लवकरात लवकर त्याला सोडण्याबाबत मागणी पिडीत कुटूबांने केली असता याविषयी बोलतांना आ. खडसे यांनी मुलीच्या पित्याची कारागृहातील वर्तवणूक व एकून रेकॉर्ड मागवून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करु असे आश्‍वासन दिले.

आर्थिक मदत नाही
अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याने नाराजी पिडीत कुटुंबीयांनी व्यक्त केली. समाज कल्याण विभागाकडूनही अद्याप कोणतीच मदत मिळाली नाही. याबाबत विचारणा करताना आ.खडसे यांनी केस महिला व बाल काल्याण विभागाच्या मनोधैर्या अंतर्गत असल्याने महिला आयोगाच्या देवयानी ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून पिडीत कुटुंबाची भेट घेवून योग्यती मदत करण्याबाबत सुचना केल्या व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचीही मदतीबाबत माहीती घेतली.

सहकारमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट
समता नगरातील नऊवर्षीय बालीकेवर झालेल्या अत्याचारातील पिडीत कुटूंबाला सांत्वनासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेतली. यावेळी बोलतांना घडलेली घटना ही राज्याला आणि देशाला हादरावणारी घटना असून सरकार म्हणून परीवाराच्या सोबत आहे आणि लागेल ती मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे पाटील यांनी संगितले. तसेच पालीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी दुरध्वनीवरुन पुढील तपास जलद गतिने करण्याच्या सुचनाही दिल्या. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, पालकमंत्री हे जरी पालक असले, मात्र, पालकत्व म्हणजे काय असते हे त्यांनी माहित नसल्यामुळे त्यांना या घटनेचे गांभीर्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
झालेले घटनेच्या प्रकाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांंच्याशी चर्चा करुन कॅबिनेटच्या बैठकित या घटनेच्या विषयावर चर्चा करु व पिडीत कुटुंबाला न्याय मिळविण्यासाठी प्रसिध्द विधीतज्ञांशी चर्चा करेल. पिडीतांना न्याय मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही, असे आश्‍वासन पाटील यांनी दिले. यावेळी सफाई मजदूर युनियनचे अध्यक्ष अरुण चांगरे, नवलभाऊ पाटील, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, जितेंद्र करोसिया आदी उपस्थित होते.