माजी मंत्री खडसे पुन्हा गरजले ; स्वस्त धान्य घोटाळ्याची व्याप्ती मोठी

0

दोषी अधिकार्‍यांना जेलमध्ये पाठवल्यानंतरच स्वस्त बसणार

बोदवड :- स्वस्त धान्य घोटाळ्याची व्याप्ती शंभर कोटींपेक्षा अधिक असून यात जे कोणी दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे दिला.

बोदवड येथे लग्नसोहळ्यानिमित्त सोमवारी ते आल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. खडसे यांनी शंभर कोटी रुपयांचा स्वस्त धान्य घोटाळा झाल्याचे पुन्हा ठासून सांगत जिल्हाभरातील दोषी अधिकार्‍यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे सांगितले. भुसावळात सर्वाधिक स्वस्त धान्याचा घोटाळा झाल्याचो पुर्नउच्चार करीत त्यांने तोलकाट्यातही गफलत असल्याचे सांगितले. स्वस्त धान्याचा काळाबाजार करणार्‍या रॅकेटचा निश्‍चितच पर्दाफाश होईल व दोषी अधिकारी मग ते कुणीही असो जेलमध्ये जातील, असा पुर्नउच्चारही त्यांनी केला.