माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

0

मुक्ताईनगरात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे उद्घाटन : चौघा मंत्र्यांची राहणार उपस्थिती

भुसावळ- राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळसह मुक्ताईनगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहर शुभेच्छा फलकांनी सजले असून कार्यकर्त्यांमध्ये नाथाभाऊंच्या वाढदिवसाविषयी अधिक उत्कंठा वाढली आहे. मुक्ताईनगर येथे शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाचे उद्घाटन रविवार, 2 रोजी सकाळी 11 वाजता होत आहे. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

श्री क्षेत्र कोथळीत नागरी सत्कार
रविवारी सकाळी 11.30 वाजता माजी मंत्री खडसेंचा नागरी सत्कार श्री क्षेत्र कोथळी येथील मुक्ताई मंदिरात करण्यात येणार आहे. भुसावळातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे नगरपालिका रुग्णालयात फळ वाटप तसेच रेल्वे स्थानकावर अन्नदान करण्यात येणार असून रविवारी सकाळी नऊ वाजता काच बंगल्यापासून चारचाकी रॅली मुक्ताईनगरसाठी निघणार आहे शिवाय मुस्लीम समुदायाकडून वह्या-पुस्तकांचे वाटपही करण्यात येणार आहे.