माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांची दिल्ली कॉंग्रेस अध्यक्षपदी निवडीची शक्यता

0

नवी दिल्ली-कॉंग्रेस नेते दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी काल राजीनामा दिला. त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्या शीला दिक्षित यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान अद्याप त्यांच्या नावाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी याबाबत निर्णय घेणार आहे.

शीला दिक्षित ह्या दिल्लीत ‘आप’सोबत आघाडी करण्याबाबत अधिक आग्रही आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. आघाडी, युतीबाबत राजकीय पक्ष विचार-विनिमय करत आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे.