नंदुरबार । जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. माजी विद्यार्थ्यांच्यावतीने 42 हजार रुपये किमतीचे दोन जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले. या यंत्राचे उद्धघाटन उपप्राचार्य ओ.एस. शर्मा व सुरेंद्र देवरे यांच्या हस्ते झाले. जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी संघटनेचे प्रभारीे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर पाटील व त्यांच्यासह इतर माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करुन विद्यालयाचे ऋण व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रम
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्या मीरा सिंग ह्या होत्या तर उपप्राचार्य ओ.एस. शर्मा, आर.बी. गुप्ता, आर.एल.सिंग, ए.एन.कापडणीस आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवोदयच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून दिला. यावेळी उपक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे आशुतोष वडाळकर यांनी काम पाहिले. गेल्या वर्षी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे नंदुरबार येथील काकुमाय अपंग सेवा संस्थेला चारशे लिटरचे वॉटर सोलर हिटर बसविण्यात आले होते.
अनेक विद्यार्थी मोठ्या पदांवर
जवाहर नवोदय विद्यालयातून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी आज मोठ्या प्रशासकीय पदांवर कार्यरत आहेत. तसेच डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील आदी क्षेत्रात काम करुन समाजसेवा करीत आहेत. या माजी विद्यार्थी संघटनेने विविध सामाजिक व विधायक काम करण्याचा मानस केला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र देवरे यांनी केले. आभार माजी विद्यार्थी संघटनेचे नागसेन पेंढारकर यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास कांतीलाल तडवी, डॉ.भानुदास गावीत, डॉ.निलेश गांगुर्डे, अनिल नाईक, सुनील मोहिते, ईश्वर वळवी, डॉ.संतोषी पगरिया, डॉ.सुनील वळवी, डॉ.संजीव वळवी, मंत्रालयातील अव्वर सचिव प्रतिभा पाटील, आश्विनी बागल, आशा पाटील, डॉ.पंकज पाटील, गजेंद्र हिरे, महेंद्र मोहिते, विजय चौरे, रविकांत थोरात, डॉ. महेंद्र आखाडे, नथ्थू कुंभार, नरेंद्र दाभाडे, किरण तमखाणे, संदीप आखाडे, नयन आघाव, संदीप सोनवणे, मनोज बेहरे, जगदीश सोनवणे आदी. माजी विद्यार्थी उपस्थित होते.