माजी सभापती डी.ओ.पाटील यांची निर्घृण हत्या

0

कुर्‍हाकाकोडा गावातील पेट्रोल पंपाबाहेर आढळला मृतदेह

मुक्ताईनगर : माजी सभापती डी.ओ.पाटील यांची अज्ञात आरोपीने गावातीलच पेट्रोल पंपाजवळ धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर मोठा जमाव घटनास्थळी जमला आहे. हत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही मात्र पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत हत्येची घटना कैद झाल्याचे सांगण्यात आले. मध्यरात्री तीन ते साडेदरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी श्‍वान पथकाला पाचारण केले आहे. पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.