माजी सभापती रामदास ठाकूर यांचे शक्ती प्रदर्शन 

0
वेध खेड-आळंदी विधानसभा निवडणुकीचे
आळंदी : खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे खेडच्या विविध विकासकामांसाठी आयोजित दौर्‍यानिमित्त खेड-आळंदी विधानसभेच्या उमेदवारीच्या पार्श्‍वभूमीवर सभेसाठी जाताना जोरदार शक्ति प्रदर्शन केले. ठाकूर यांनी समर्थकांसह हजेरी लावली. यावेळी त्यांचे समवेत हजारो समर्थक उपस्थित होते. व्यासपीठावर देखील हजेरी लावत त्यांनी तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधून घेतले. सभेस आलेल्या जनतेसाठी विविध सोयी सुविधा देत समर्थकांसह कार्यकर्त्यांचे लक्ष त्यांनी वेधले. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जनतेशी विविध कार्यक्रमानिमित्त संवाद साधत निवडणुकीची तयारी त्यांनी सुरु केल्याचे संकेत दिले आहेत. यावेळी आता थांबायचे नाय आता एकच लक्ष विधानसभा जिंकायची असा चंग देखील त्यांचे समर्थक, कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. सोळू ग्रामपंचायतीत देखील सरपंच लोकमतातून निवडून आणीत त्यांनी बेरजेच्या राजकारणास सुरुवात केली असल्याचे नागरिक सांगतात.
धार्मिक उपक्रमांना लावली हजेरी
नुकत्याच झालेल्या नवरात्रातील धार्मिक उपक्रमांची संधीदेखील साधून त्यांनी तालुक्यात ग्रामस्थांशी संवाद गावभेट संपर्क अभियान राबविले. त्यातून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे सर्वत्र झालेल्या कार्यक्रमांतून दिसले. खेड आळंदी विधानसभा निवडणुकीचा वेध या दौर्‍यातून त्यांनी घेतला. या दौर्‍यास पदाधिकारी, नागरिकांसह सर्व सामान्य जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. खेड तालुक्याला आता लोकसभेबरोबरच खेड-आळंदी विधानसभेचे निवडणुकीचे वेध लागल्याचे दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून आळंदी परिसरातील सोळूचे भूषण माजी सरपंच व सभापती रामदास ठाकूर यांनी येत्या विधानसभेची निवडणूक लढवून जिंकणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे. खेड तालुक्यात विकासाची गंगा अधिक गतीने सुरु करण्यास निवडणूक लढविणार आणि जिंकणार असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. खेडमध्ये सभापती म्हणून केलेले कार्य खेडच्या जनतेने जवळून पाहिले आहे. रामदास ठाकूर यांनी नवरात्रीचे उत्सवाचे निमित्ताने तसेच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खेडच्या दौर्‍यानिमित्ताने संधी साधली. खेडच्या विधानसभेला उमेदवारी कोणाला द्यायची याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. नवरात्रीनिमित्त त्यांनी तालुक्यातील मरकळ, गोलेगाव, कान्हेवाडी, आळंदी, सोळू, चिंबळी, निघोजे, खालुंब्रे, म्हाळुंगे, साबळेवाडी, खराबवाडी, कन्हेरसर, दावडी, रेटवडी आदी गावांत सार्वजनिक मंडळांसह गावात पदाधिकारी, ग्रामस्थ यांचेशी यानिमित्त संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेतून त्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या संपर्क मोहिमेतून संवाद साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रमांना हजेरी लावत जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समर्थक सांगतात.