माजी सैनिक व फॅक्टरी कर्मचार्‍यांची सहावा आयोग मिळण्याची मागणी

0

वरणगाव। गेल्या पाच महिन्यांपासून वरणगाव परिसरातील माजी सैनिक व ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगावमधील कर्मचारी यांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरणगाव कर्मचार्‍यांना 6 व्या वेतनातील फरक देत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी सह माजी सैनिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गेल्या 6 महिन्यांआधी माजी सैनिक व सेवानिवृत्त वरणगाव फॅक्टरी कर्मचारी यांचे 6 व्या वेतनाचा फरक इतर बँकानी तात्काळ वितरीत केला आहे. मात्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरणगाव यांनी आजपर्यंत माजी सैनिकांना 6 व्या वेतन देत नसल्याने त्यांनी सतत पाच महिन्यांपासून शाखेत तोंडी अथवा लेखी देवू देखील बँक त्यांना 6 व्या वेतनातील फरक देण्यास टाळाटाळ करीत आहे. माजी सैनिकांनी देशासाठी आपले उभे आयुष्य वेचले त्यामुळे माजी सैनिकासह जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र चौधरी हे तीव्र आंदोलन 27 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वरणगाव महामार्गालगत उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.