नवी दिल्ली-गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहे. ऋषी कपूर हे कर्करोगाने ग्रस्त आहेत. प्रथमच ऋषी कपूर बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आजाराबद्दल बोलले. माझ्या तब्येतीत आधीपेक्षा बरीच सुधारणा आहे. मी आणखी काही दिवस कामावर परतू शकणार नाही. उपचार अद्यापही सुरु आहेत. या आजारापणातून लवकरच बाहेर येईल, अशी आशा करतो. परमेश्वराची कृपा राहिली तर लवकरच कामावरही परतेल, असे ऋषी कपूर म्हणाले. माझा उपचार प्रचंड थकवणारा आणि दीर्घकाळ चालणारा आहेत. यासाठी संयम लागतो आणि दुदैवाने माझ्या स्वभावात तोच नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
सुरुवातील कपूर कुटुंबाने ऋषी कपूर यांच्या आजारपणाबाबत निव्वळ अफवा असल्याचे सांगत बातमीचे खंडन केले होते. पण अलीकडे नीतू यांच्याच एका पोस्टनंतर पुन्हा एकदा ऋषी कपूर यांना कॅन्सर असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. न्यु ईअर सेलिब्रेशनचा एक फोटो नीतू सिंग यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला होता.