जळगावमध्ये इकरा, मिल्लत आणि अँग्लो अशा शैक्षणिक संस्थांमध्ये समाजातील लोकांना शिक्षण खुले मिळत असल्यामुळे आमच्यावर हे उपकारच झाले आहेत. ज्यामुळे समाज अंधारातून प्रकाशाकडे जात आहे. या वर्षाच्या शैक्षणिक प्रवेशाचा मी स्वतः भाग बनुन बघितल्यावर अतिशय आश्वासक चित्र दिसून येत आहे. आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थामध्ये जागा कमी पडायला लागल्या आहेत. इमारती लहान वाटायला लागल्या आहेत. एक वेळ अशी होती, की घरोघरी जाऊन मुलांना शाळेत बळजबरीने बोलवावे लागायचे. त्यावेळेस आई-वडील त्यांना शाळेत पाठवत नव्हते.
आज परिस्थीती बदलेली आहे. प्रवेशासाठी लागलेल्या लांब रांगा पाहून मन भरून येते. ही शैक्षणिक प्रगती माझ्या जळगाव आणि खान्देशासाठी आभिमानाची बाब झाली आहे. या सोबतच मी एक महत्त्वाचा गोष्ट सुचवू इच्छितो की, जिथे पवित्र कुरानमध्ये 6 हजार 666 आयातमध्ये रोजा, नमाज, हज आणि जकातसारखे आदेश किंवा देवाने दिलेला संदेश यामध्ये सर्वात आधी जो आदेश दिलेला आहे तो म्हणजे ङ्गशिक्षणफ त्यामुळे आपण आधी शिक्षणावर पुर्ण लक्ष केंद्रीत केले पाहिजे. पण मी बघत आलो आहे, आणि मला या गोष्टीची चिड सुद्धा येते की, शिक्षण घेऊन देखील चारित्र्य, नम्रता, भुमिका, आई-वडीलांची आणि वडीलधार्या मंडळींची सेवा करणे या गोष्टी कुठेतरी कमी होतांना दिसत आहेत. सरकारी माध्यमांमध्ये आणि टिव्हीवर प्रत्येक वेळेस काही जाहिराती आणि गीत ऐकायला मिळतात की, ङ्गमाझा देश बदलतो आहे.फ खरोखर बदलत आहे. डाळीपेक्षा स्वस्त इथला दलित आणि मांसापेक्षा स्वस्त मुसलमान अशी स्थिती झाली आहे. त्याला कुठेही केव्हाही कधीही मारुन टाका, कुठलीच चिंता नाही. अनन्वित अत्याचार करा, घरदार जाळून टाका तरी कुठलाच गुन्हा नाही. दररोजच्या अशा बातम्या घाबरवून सोडत आहेत. आणि हा सगळा खेळ फक्त आणि फक्त राजकारणाचा भाग आहे. आणि याचे प्रतिबिंब जळगाव आणि खान्देशात सुद्धा या वर्षभरात काही प्रमाणात उमटल्याचे दिसू लागले असून ते माणुसकी आणि देशासाठी हानिकारक आहे. यामुळे देश विखंडीत आणि शेवटी नेस्तनाबूद होण्याची भिती आहे. याकरीताच देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळ्यात पुढे आणि प्रत्येक ठिकाणी भाग घेणारी संघटना ङ्गजमियत उलमा हिंदफने एकता मजबूत ठेवण्याचा संकल्प केला आहे. आपण राष्ट्रीय एकता, हिंदु-मुस्लिम भाईचारा, आपसातील प्रेम वाढविले तर हा देश वाचेल या यामागचा हेतू आहे. ङ्गजमियत उलमा हिंदफ चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी संपूर्ण देशात ङ्गजमियतफच्या निधीमधुन कोट्यवधी रूपयांचा खर्च करून जागोजागी सर्व धर्मातील धर्मगुरुंना एका मंचावर बसवून इथल्या बांधवांना प्रेम, जिव्हाळा, शांती, एकता, सदभावनेचा संदेश दिला आहे. धुळे, मालेगाव आणि जळगावमध्ये देखील ङ्गजमियत उलमा हिंदफ ने एकता संमेलनाचे आयोजन करून सर्व धर्मांच्या धर्मगुरुंना एकत्रित करून हा प्रेमाचा संदेश दिला आहे.
हवेली, झोपडी सब का मुकद्दर फूट जायेगा
अगर ये साथ हिन्दु और मुस्लिम छूट जायेगा
दुआ करो ये प्यार के रिश्ते रहे कायम
ये रिश्ते टूट जाऐंगे तो भारत टूट जायेगा
या सगळ्या गोष्टींना यशस्वी करण्यासाठी सगळ्यात मोठी सोबत हवी आहे ती सर्व सामान्य नागरिक, शासन, प्रशासन यांची ! परंतु जे कुणाच्याही दबावात येतात, आणि जिथे न्याय मिळत नाही, गुन्हेगार, खुनी, अपराधी, ज्यांना शिक्षा होत नाही, पाच-पाच सहा-सहा महिन्यांपर्यंत गुन्हेगारांना पकडण्यात येत नाही. त्यामुळेच हा अन्याय आतंकवाद, दहशतवाद्यांना जन्म देतो. त्यामुळेच मी सर्व नागरिकांना विनंती करतो की, राजकारणी राजकारणात आणि सत्तेच्या व खुर्चीसाठी भांडणार्या नेत्यांच्या भांडणात तुम्ही पडू नका. लढाई वा भांडणात
कुणाचेही हित नाही. एका कवीने म्हटले आहे की,
दुनिया में अम्नो प्यार के किस्से लिखेगा कौन?
आपस में कट मरेंगे तो आखिर बचेगा कौन?
होंगे ना तुम तो लाऐंगे तुमसा कहाँ से हम
होंगे ना हम तो आप को भाई कहेगा कौन?
मुफ्ती हारून नदवी
जमियत-उलेमा-ए-हिंद जळगाव जिल्हाध्यक्ष
-मो. 9923223361