भुजबळाची सर्वोच्च न्यायालयात धाव
मुंबई : मला झालेली अटक ही बेकायदेशीर असून नियमाचे उल्लंघन करणारी आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी न्याय मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भुजबळ यांना मनी लाँड्रिंग व भ्रष्टाचारप्रकरणी विविध गुन्ह्यांतर्गत अटक झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांनाही तुरूंगात डांबले आहे. हे चुलते-पुतणे गेली दोन वर्षापासून तुरूंगात आहेत. मात्र, ईडी अथवा इतर तपास यंत्रणांना अद्याप भुजबळांविरोधात आरोप सिद्ध करता आलेले नाहीत. मात्र, त्यांना ईडी व मुंबई उच्च न्यायालयाने वारंवार जामीन मंजूर करण्यास विरोध केल्याचे दिसून आले आहे. अखेर भुजबळ यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.