घटस्फोटावर बोलले तेज प्रताप यादव; ‘क्या करें, मर जाएं हम…फांसी लगा लें?’

0

पटना- घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव याने आपल्याच कुटुंबाविरोधात बंड पुकारला आहे. आपल्या नात्यात दुरावा येण्यामागे दुसरे कोणी नाही तर आपले कुटुंब जबाबदार असल्याचे तेज प्रताप यादव याचे म्हणणे आहे. इतकंच नाही तर आपल्याविरोधात कट आखला जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे. अशा परिस्थितीत मी काय करू, जीव देऊ का?असा सवाल उपस्थित केला आहे.

न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर तेज प्रताप यादव याने दुसऱ्या दिवशी आपले वडील आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची रांचीतील रुग्णालयात जाऊन भेट घेतली. लालू यादव यांचादेखील तेज प्रतापला पाठिंबा नसल्याचे दिसत आहे. मात्र तेज प्रतापने आपला निर्णय ठरवला आहे. ‘वडिलांनी मला थोडे थांबण्याचा सल्ला दिला आहे, पण मी माझा निर्णय बदलणार नाही, असे तेज प्रताप यादव यांनी सांगितले.