माझ्यावरील हल्ल्यामागे अमेरिका, कोलंबियाचा हात

0

व्हेनेझुएला-टीव्ही चॅनलवर लाइव्ह भाषण सुरू असताना व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्यावर काल ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यातून मादुरो थोडक्यात बचावले. पण, या हल्ल्यामागे अमेरिका आणि कोलंबियाचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, अमेरिकेने या आरोपांवर मौन बाळगलं असून कोलंबियाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे, या हल्ल्यासाठी मादुरोंनी अमेरिका आणि कोलंबियाला जबाबदार धरले असले तरी व्हेनेझुएलाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामागे विरोधी पक्षाच्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.