मुंबई : बॉलिवूडमध्ये कलाकारांची एकमेकांसोबत असलेली जवळीकता किंवा त्यांचे ब्रेकअप याबद्दलही चर्चा ही नेहमी सुरू असते. असाच एक कपल काही वर्षांपूर्वी दुरावला. कॅटरिना आणि रणबीरचे ब्रेकअप होऊन दोन वर्षे उलटली. रणबीरसोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलली कॅटरिना.
एका मुलाखतीत कॅटरिनाने याबाबत काही गोष्टींचा खुलासा केला. ‘रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतरची वेळ माझ्यासाठी फार कठीण होती. त्यानंतर मी फक्त माझ्या करिअरकडे लक्ष द्यायचं ठरवलं. आपला स्वभाव असा असतो, की जेव्हा कोणाचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करायचे असते. तेव्हा आपण खूप प्रयत्न करत असतो. मात्र, आपला आनंद कशात आहे, आपली प्रेरणा काय आहे, आपल्या जबाबदाऱ्या या सर्व गोष्टींवर विचारपूर्वक निर्णय घेणं महत्वाचं असतं. आता मी माझं आयुष्य वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत आहे. जेव्हा तुम्ही पुर्णत: स्वत:कडे लक्ष केंद्रीत करता, तेव्हा कोणतीच गोष्ट तुमचं लक्ष विचलित करू शकत नाही’, असे कॅटरिनाने या मुलाखतीत म्हटले.
मात्र, ‘बदलत्या काळाने मलाही खूप काही शिकवले. मी या कठीण काळातूनही खूप काही शिकलेय. आता मी या गोष्टींना वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते’, असेही ती पुढे म्हणाली.