माझ्या जनसंपर्क अधिकाऱ्याचा व्हॉट्सअॅप नंबर बंद; धनंजय मुंडे यांचा सरकारवर आरोप

0

मुंबई- विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचा व्हॉट्सअॅप नंबर अचानक बंद करण्यात आला आहे. यावरून धनंजय मुंडे यांनी सरकारवर आरोप केले आहे. धनंजय मुंडे यांनी माझे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी हे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बातम्या आणि माझ्या राजकीय बैठका तसेच बातम्या शेअर करण्यासाठी वापरतात. त्याच्या फोनवर बंदी आणत आणीबाणीच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

बुधवारी संध्याकाळी अचानक माझे व्हॉट्सअॅप बंद झाले. जेव्ही मी नव्याने व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्या फोन क्रमांकावर व्हॉट्सअॅप वापरण्यावर बंदी आणण्यात आल्याचा मेसेज आला, अशी माहिती धनंजय मुंडे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांनी दिली आहे.