मुंबई : आलिया भट आणि रणबीर कपूर एकेमकांना डेट करत आहेत हे सर्वत्र माहिती आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नानंतर आता आलिया आणि रणबीरच्या लग्नाची असफवा पसरत आहे. मात्र, या विवाहाच्या अफवांमध्ये आलिया भट्टने स्पष्ट केले आहे की त्यांच्या चाहत्यांना आणि शुभचिंतकांना लग्नाची प्रतीक्षा करावी लागेल.
आलियाने लक्स गोल्डन रोझ अवॉर्ड्स 2018 च्या प्रसंगी प्रसारमाध्यमांना सांगितले, “जर लोक माझ्या विवाहाची वाट पाहत असतील तर त्यांना त्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागेल.” आलियाने आणि रणबीर यांच्यातील संबंधांची चर्चा बर्याच काळापासून चालू आहे.