माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे म्हणजेच शिक्षण

0

अमळनेर : माणुस कितीही उच्चशिक्षत असला परंतु शिक्षणाची खरी व्याख्या म्हणजे माणसाने माणसाशी माणुस म्हणुन वागले पाहीजे व जिवनात प्रत्त्येकाला प्रेम दिले पाहीजे. लोक फक्त आपल्या प्रेमाचे भुकेले असतात आणि प्रेमानेच माणसे जोडली जातात असे प्रतिपादन फिनिक्स सोशल अवेरनेस गृपच्या अध्यक्षा अ‍ॅड ललिता पाटील यांनी केले.

येत्या 24 डिसेंबर रोजी पुज्य साने गुरुजी यांची जयंती संपूर्ण राज्यात उत्साहाने साजरी होणार आह. आणि अमळनेर तर साने गुरुजींची कर्मभूमी असुन त्याठिकाणी साने गुरूजींनी दिलेल्या प्रेमाचा संदेश व त्यांचे विचार लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी फिनिक्स सोशल अवेरनेस गृप 24 तारखेपर्यत रात्री 8 ते 9 या वेळेत अमळनेरातील प्रत्येक भागात जावुन श्यामची आई या पुस्तकाच्या रोज दोन कथा नागरीकांना सांगणार आहे.

श्यामची आई मधील दोन कथा सांगणार
श्यामची आई या पुस्तकाच्या रोज दोन कथा सांगण्यासाठी उपक्रमाची सुरूवात शुक्रवार 9 डिसेंबर पासून प्रतापनगर येथुन करण्यात आली. यावेळी गृपच्या अध्यक्षा अ‍ॅड सौ ललिताताई पाटील यांनी मार्गदर्शन केले व सौ वसुंधरा लांडगे यांनी “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” ही प्रार्थना सादर करून कथेचे वाचन केले. याप्रसंगी नवनियुक्त नगरसेवक मनोज पाटील, प्रा. विश्वनाथ ठाकरे, कोमल पारेख, मनोहर बागुल, अमोल माळी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक अमोल माळी यांनी केले तर आभार मनोज पाटील यांनी मानले.