भुसावळ शहरात कोटेचा व्याख्यानमालेत डॉ.भूषणकुमार उपाध्याय ; चांगल्या विचारातून घडते ‘चांगले कर्म’
भुसावळ : जगात प्रत्येक पूजेत डोळे बंद करण्यास सांगितले जाते त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. श्वास व मनाचा जवळचा संबंध आहे. जसे मन शांत होत जाईल तस-तसा आनंद प्रकट होईल. माणसाला दुःख भुतकाळाचे व ताण भविष्य काळाचा असलातरी वर्तमानकाळातच आनंद मिळतो. धर्म माणसाला वर्तमान काळात राहायला शिकविते. तुमचा जसा धर्म असेल तशी संस्कृती असते, असे विचार डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे व्यक्त केले.
यांची उपस्थिती
स्वर्गीय कपूरचंद कोटेचा ट्रस्ट, महावीर कृपा अकादमी व कोटेचा पतसंस्था यांच्यातर्फे आयोजित कपूरचंद कोटेचा स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प त्यांनी ‘ धर्म व संस्कृती’ या विषयावर गुंफले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, दीपेश कोटेचा, पद्मा कोटेचा यांची उपस्थिती होती.