पिंपरी: इन्स्टिट्यूटविषयी माहिती देताना अमित गोरखे म्हणाले की, नॉवेल इन्स्टिट्यूटने 2003 मध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम सुरू केला. त्यानंतर शाळा आणि इतर शाखांचे जाळे पसरत गेले. महाविद्यालयातील या रोपट्याचा आज वृक्ष झाला आहे. येथे येणार्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
हे देखील वाचा
मात्र, विद्यार्थ्यांनीही शिक्षण घेत असताना चांगली संगत, चांगली वर्तणूक, अभ्यास, प्रयत्न केले पाहिजेत, तरच यश मिळते. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असताना जनसंपर्क वाढवा, माणसे जोडायला शिका तरच तुम्ही या क्षेत्रात टिकाल. शिक्षणाबरोबरच मजा, मस्तीचाही आंनद लुटावा; मात्र त्यातून इतरांना त्रास होणार नाही याची ही प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.