नागपूर-कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपुष्ठात येणार आहे. त्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते. मात्र अद्याप याबाबत विधान परिषद सभापती यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.