मातृभूमी, ऑल स्टार लगान, क्लासमेंट विजयी

0

आमदार संजय सावकारे यांनी वाढवला खेळाडूंचा उत्साह

भुसावळ- तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत व जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना आयोजित सरपंच चषक-(5) स्पर्धेत दुसर्‍या दिवशी मातृभूभी, ऑल स्टार लगान, क्लासमेट या संघांनी आपापले सामने जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला. आमदार सावकारे यांनी महामार्गावर गाडीतूनच सामन्यांचा आनंद घेऊन खेळाडूंचा उत्साह वाढविला. राष्ट्रीय महामार्गालगत जिल्हा परीषद केंद्र शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या सरपंच चषक स्पर्धेत दुसर्‍या दिवशी पहिल्या सामन्यात मातृभूमीने रायझिंग स्टार संघाचा 21 धावांनी पराभव केला. यात सचिन सोनवणे यांनी 37 धावा केल्या. ऑल स्टार लगान विरुद्ध नवनाथ-2 या सामन्यात ऑल स्टार लगान ने नवनाथ-( जूनियर)चा 64 धावांनी पराभव केला, फैजान बागवान याने 40 धावा केल्या. सत्कार संघाचा क्लास मेट संघाने 3 गड्यांनी पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.

आमदाराची गाडी थांबली व खेळाडूंमध्ये उत्साह वाढला
सत्कार व क्लासमेट या संघात दरम्यान सुरू असलेला सामना एकतर्फी होत असताना याच वेळेस जळगाव वरून भुसावळकडे जात असताना आमदार संजय सावकारे यांनी महामार्गावरूनच सामन्याचा आनंद लुटण्यासाठी गाडी रस्त्याच्या कडेला केली व त्यांची गाडी थांबताच क्लासमेट संघाच्या खेळाडूमध्ये उत्साह वाढला व हातातील निसटणारा सामना क्लासमेटने आश्चर्यकारकरीत्या तीन गड्यांनी जिंकला. ामना जिंकल्यानंतर आमदार संजय सावकारे यांनी विजयी व उपविजयी खेळाडूंची भेट घेत पुन्हा उत्साह वाढवून शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वीतेसाठी सरपंच अनिल पाटील, माजी सरपंच आनंदा ठाकरे, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल आयोजन कमिटीचे सदस्य प्रयत्नशील आहे. पंच म्हणून अलीम शेख, अक्रम खान होते. समालोचक रमजान पटेल तर गुणलेखक म्हणून राजू भोईटे होते.