मुंबई-पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव झालेला असून आता पराभवानंतर शिवसेनेची बैठक होणार आहे. शिवसेनेचे नेते मात्रोश्रीवर जमत असून लवकरच बैठकीला सुरुवात होणार आहे. पालघरमध्ये भाजपचे दिवंगत खासदार श्रीनिवास वनगा यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.