पिंपरी-चिंचवड : मुंबई, पुण्याच्या धर्तीवर औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये कामगारांना घरे नव्हती. त्यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटना गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होती. त्याला आता यश मिळत आहे. लवकरच माथाडी कामगारांना अल्प दरात स्वत:चे हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी दिली. आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवनात मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व स्नेहमेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.
यांची होती उपस्थिती
आमदार गौतम चाबुकस्वार, नगरसेविका पोर्णिमा सोनवणे, योगिता नागरगोजे, नगरसेवक केशव घोळवे, मोरेश्वर शेडगे, शिवसेनेच्या शहर संघटिका सुलभा उबाळे, मनोहर भिसे, किसन बावकर, परेश मोरे, नितीन धोत्रे, प्रमोद शेलार, मारुती कौदरे, भिवाजी वाटेकर, अप्पा मुजुमले, रघुनंद घुले, खंडू गवळी, पांडुरंग कदम, गोरक्ष दुबाले, बाबासाहेब पोते, परमेश्वर मुळे, अशोक साळुंखे, जसबिर राणा, खंडु थोरवे, मुरली कदम, हनुमंत शिंदे, वनदेव खामकर, नितीन कदन, सतीश कंटाळे, अशोक देवकाते आदी उपस्थित होते.
लाभांशाचे वाटप
पतसंस्थेचे संस्थापक मनोहर भिसे म्हणाले, पूर्वी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविताना खूप अडचणी येत होत्या. आता इरफान सय्यद यांच्यामुळे माथाडी कामगारांचे प्रश्न वेळेत सुटत आहेत. सय्यद यांच्यामुळे माथाडी कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत असून त्यांनी माथाडी कामगारांचे मोठे जाळे विणले आहे. यावेळी सभासदांना लाभांशाचे वाटप, उल्लेखनीय कार्य करणार्या सभासदांचा सत्कार, तसेच मृत कामगारांच्या वारसांना 20 हजारांची मदत करण्यात आली. पतसंस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कदम यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.