मुंबई : हॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आता हॉलीवूड टीव्ही सीरियल्सवरही हुकमत गाजविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी तिला मदत मिळणार आहे धकधक गर्लची. प्रियंका आपल्या माधुरी दीक्षितच्या आयुष्यावर बेतलेली एक कॉमेडी सीरियल तयार करणार आहे. यात खुद्द माधुरी तिची एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असेल.
इंटरनॅशनल लाईफस्टाईलवर या संदर्भातील बातमी प्रसिद्ध झाली आहे व प्रियंकाने स्वतः त्याला सोशल मीडियावर दुजोरा दिला आहे. एबीसी नेटवर्कवर ही सीरियल दाखविली जाणार आहे. त्यात अमेरिकेत एका शांत गंभीर गावात सेटल झालेली भारतीय मुलगी आपल्या लाईफस्टाईलने कसे रंग भरते याचे चित्रण असेल. माधुरी लग्नानंतर डेनेवर येथे सेटल झाली आहे. क्वांटिको मालिकेची निर्मिती केलेले मार्क गार्डन, माधुरीचे पती डॉ. लेले हेही या मोहिमेत सामील झाले असून, मालिकेचे लिखान श्रीराव हे करणार आहेत.