माधुरी राजपुत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

0

वरणगाव। येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राज्य विभागाची विद्यार्थीनी माधुरी मोहनसिंग राजपूत ही सन 2015-16 च्या विद्यापीठाच्या परिक्षेत गुणवत्ता यादीत पाचव्या क्रंमाकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल येथील महाविद्यालयाचे प्राचार्य अनंतराज पाटील यांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमात माधुरी व तिच्या पालकांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

प्राध्यापकांनी केले यशाचे कौतुक
यावेळी उपप्राचार्य के.बी. पाटील, प्रा. बी.जी. देशमुख, प्रा. किरण पवार व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी तिचे कौतुक केले आहे.