मानमोडीच्या विवाहितेचा जळाल्याने मृत्यू

0

बोदवड- तालुक्यातील मानमोडी येथील माहेर व भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे येथील सासर असलेल्या विवाहितेचा जळाल्याने मृत्यू झाला. सुनंदा गणेश लोहार (वय 27, रा.कुर्‍हेपानाचे, ता.भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. 4 रोजी दुपारी साडेचार वाजेपूर्वी या विवाहितेला जिल्हा सामान्य रुग्णालयात जळीत अवस्थेत दाखल करण्यात आले मात्र ही विवाहिता नेमका कशी व केव्हा जळाली याबाबत पोलिसात नोंद नाही. जिल्हा रुग्णालयाचे सीएमओ दिनेश खेताडे यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक दिलीप चौधरी करीत आहेत.