मानमोडे येथे मग्रारोहयो अंतर्गत कंम्पार्टमेंट बंडीग कामाला सुरूवात

0

असलोद: शहादा तालुक्यातील मानमोडे येथे कृषी विभागामार्फत मग्रारोहयो अंतर्गत कंम्पार्टमेंट बंडीग कामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे मजुरांना गावातल्या गावात काम मिळाल्याने मजुरांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. असे काम प्रत्येक गावाने जास्तीत लोकाना रोजगार उपलब्ध करून द्यावा. मजुराना काम मिळेल व हातात पैसा येईल. गावातील शेताचे बांध वनपरिक्षेत्रात गावठाण पडीत जागेत जास्तीत जास्त कामे मजुरांना मिळाले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी राहुल धनगर, कृषी पर्यवेक्षक बागुल, पत्रकार दिनेश पवार, पंचायत समिती सदस्य गोपी पावरा, सरपंच रेखाताई ठाकरे, उपसरपंच योगेश पावरा, पोलीस पाटील विनोद भामरे, कृषी सहाय्यक भिकुबाई पावरा,ग्रामसेवक मुकेश जाधव,तलाठी कोठारी आप्पा, ज्येष्ठ नागरिक उजन बर्डे, राजेश पावरा, रामसिंग डुडवे, पाणी फाऊंडेशन टीम मानमोडे, महिला बचत गट आदी उपस्थित होते.