परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव
सांगवी -येथील रामभाऊ जाधव यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे राज्य अध्यक्ष डेव्हिड राज आणि जनरल सेक्रेटरी अरविंद भगदगिरी यांनी जाधव यांना निवडीबद्दलचे प्रमाणपत्र दिले. जाधव यांच्या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते राजू सावळे, सचिन गवांडे पाटील, गणेश सोनवणे, गणेश कांबळे, सुमित टुमलाईट, भीम भिसे, संजू भंडारी, सोनम जाधव आदींनी अभिनंदन केले.
अन्यायाविरुद्धचा लढा तीव्र
आपल्या निवडीबाबत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रामभाऊ जाधव म्हणाले की, समाजातील कामगार, तसेच अन्य घटकांवर अन्याय होऊ न देण्याची जबाबदारी पार पाडणार आहे. अन्यायाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन संघटना अधिक बळकट करणार असून, या माध्यमातून संघटित व असंघटित कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू